SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💉 मोठी बातमी! करोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ

👁️ जगभरात अनेक लोक करोना लसीकडे डोळे लावून बसले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे.

👥 ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.

Advertisement

🤨 लसीविषयी महत्वाची माहिती :-

💁‍♂ एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे.

Advertisement

👉 ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे.

Advertisement