SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😱 मधाच्या नावाखाली तुम्ही साखरेचा पाक तर खात नाहीत ना? पतंजली, डाबर सारख्या मध उत्पादक कंपन्या संशयाच्या फेऱ्यात!

😳 सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून अनेक मोठया-मोठ्या कंपन्या मध उत्पादनाच्या नावाखाली साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

🧐 सर्वाधिक मध तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या मध तयार करताना साखर मिसळत असल्याचं या तपासाद्वारे समोर आलं आहे.

Advertisement

🔎 ‘सीएसई’ने काय केलं?

▪️ सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं म्हणजे सीएसईनं 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या तपासणीत कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं आढळलं.

Advertisement

▪️ सीएसईच्या माहितीनुसार, मधाच्या 22 मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ 5 मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याची माहिती देण्यात आली.

▪️ सीएसईनं केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालय यांसारख्या कंपन्यांचे मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत फेल ठरले.

Advertisement

▪️ या 13 कंपन्यांपैकी फक्त सफोला, मार्कफेड सोहना व नेचर्स नेक्टर या 3 कंपन्यांच्या मधाचे नमुने तपासणीत पास झाल्याची माहिती आहे.

▪️ पण डाबर आणि पतंजलीनं ‘न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स’ या चाचणीवर प्रश्न उपस्थित केला आहे. कंपनीची प्रतिष्ठा मलिन करण्याचे या चाचणीमागील षडयंत्र असल्याचं या कंपन्यांचं सांगत आहे.

Advertisement

👁‍🗨 कंपन्यांची प्रतिक्रिया-

🐝 “आमच्या कंपनीतील मध हा 100 टक्के शुद्ध व उत्तम आहे. यासोबतच जर्मनीतील एमएमआर चाचणीतदेखील तो यशस्वी ठरला होता आणि आम्ही ठरवण्यात आलेले 22 मापदंड पूर्ण करतो. अलीकडेच जो अहवाल समोर आला तो प्रायोजित असल्याची शंका आहे,” असं डाबरच्या प्रवक्त्यांकडून सांगितलं गेलं आहे.

Advertisement

🐝 भारतात आमच्या कंपनीचा मध हा आम्ही नैसर्गिकरित्या एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांनी केला आहे. दरम्यान, यामध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचं योग्यरित्या पालन करण्यात आल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे.

🐝 आम्ही 100 टक्के नैसर्गिक मध तयार करतो. प्रक्रिया केलेल्या मधाला अधिक प्रमोट केलं जावं यासाठी नैसर्गिकरित्या मध तयार करणाऱ्या कंपन्यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

Advertisement

🗣️ सीएसईच्या महासंचालक म्हणाल्या..

“साल 2003 आणि 2006 मध्ये ‘सॉफ्ट ड्रिंक’च्या तपासणीत भेसळ आढळून आली, त्यापेक्षा भयानक भेसळ ही यावेळी मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला हानिकारक आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमुने तपासले गेले त्यापैकी 10 एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या 10 कंपन्यांमधील नमूने भारतीय मापदंडानुसार नव्हते”, अशी माहिती सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी दिली.

Advertisement

👌 दर्जेदार माहिती देणाऱ्या स्प्रेडइट डिजीटल वृत्तपत्राला इन्स्टाग्रामवर नक्की फॉलो करा 👉 https://www.instagram.com/spreadit_india/

Advertisement