SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😱 वर्षभरात ‘हा’ शब्द जगात सर्वाधिक वापरला गेला? तो कोणता वाचा..

😷 जगभर पसरलेल्या कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ‘पॅंडेमिक’ अर्थात महामारी म्हणून घोषित केलं होतं. या पार्श्वभूमीवर डिक्शनरी डॉट कॉमने ‘पँडेमिक’ (जागतिक साथ) शब्दाची 2020 मधील ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषणा केली आहे.

🧐 ‘पॅंडेमिक’चे मूळ लॅटिन आणि ग्रीक भाषेत यातील ‘पॅन’ म्हणजे सर्व आणि डेमॉस म्हणजे सर्व लोकसंख्येसाठी असा अर्थ होतो. हा शब्द साधारणपणे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला विशेषत: वैद्यकीय अहवालात साथीच्या रोगांच्या संदर्भात वापरला गेला.

Advertisement

💁🏻‍♂️ डिक्शनरी डॉट कॉमची घोषणा-

▪️ डिक्शनरी डॉट कॉमचे सिनिअर एडिटर जॉन केली यांनी याबाबत सांगितले की, कोरोना संसर्ग जागतिक पातळीवर पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मार्च महिन्यात जाहीर केले आणि मार्चमध्ये या शब्दाचा शोध कितीतरी पटीने वाढला.

Advertisement

▪️ यानंतर दर महिन्याला या शब्दाचा शोध/सर्च वाढत गेला. हा शोध 100 टक्क्यांहून अधिक आहे, असेही ते म्हणाले.

▪️ कदाचित भविष्यात सध्याच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी ‘पँडेमिक’ याच शब्दाचा वापर होईल, अशी शक्यताही आहे.

Advertisement

📈 वर्ल्डॉमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत 63,589,725 कोरोनाच्या केसेस आढळल्या आहेत. त्यापैकी 18,131,076 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 1,473,926 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर 43,984,723 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisement