SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, तर ‘हा’ अभिनेता बनला ‘हिरो ऑफ द इयर’

📃 ‘याहू’ने भारतामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वात जास्त सर्च केलेल्या नावांची यादी जाहीर केली आहे. याहूच्या या यादीनुसार यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये लोकांनी अधिक चर्चेत राहिलेला दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केलं असल्याचं म्हटलं आहे.

😓 यावर्षी जून महिन्यामध्ये आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडलेला सुशांत भारतात सर्वाधिक सर्च झालेला सेलिब्रिटी बनला आहे. या यादीत सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीही मागे नाही. ती सर्वात जास्त सर्च असलेली महिला सेलिब्रिटी ठरली आहे.

Advertisement

👉 2017 नंतरचं हे पहिलं-वहिलं वर्ष आहे, ज्या वेळेस पंतप्रधान मोदींनी या यादीत पहिलं स्थान मिळवलेलं नाही. पण मोदी काही दूर नाही, ते यावर्षी फक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती आहे.

🧐 ‘या’ यादीत नंतर कोण?

Advertisement

▪️रिया चक्रवर्तीनंतर या यादीत राहुल गांधी, अमित शाह, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अमिताभ बच्चन आणि कंगना रनौत यांचा नंबर लागतो.

▪️सुशांत सिंह राजपूत ‘मोस्ट सर्च मेल सेलेब्रिटी’ श्रेणीमध्ये अव्वल स्थानावर आहे. यानतंर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान आणि ऋषी कपूर आहेत.

Advertisement

▪️या वर्षातील यादीत पहिल्या 10 जणांत राजकीय व्यक्तींचा अधिक समावेश आहे.

🗣️ 2020 मधील ‘टॉप न्यूजमेकर्स’च्या माहितीनुसार,

Advertisement

📌 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या नंबरवर आहेत. तर सुशांत आणि रिया संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आणि राहुल गांधी तिसऱ्या स्थानावर आहेत.

📌 तर सुशांत राजपुत प्रकरणांनातर अचानक चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती मोस्ट सर्च फीमेल सेलिब्रिटी’च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

Advertisement

📌 यासोबतच, अभिनेता सोनू सूदला या श्रेणीत विशेष स्थान मिळालं आहे. त्याची ‘हीरो ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली आहे. कोरोना महामारीमध्ये परप्रांतिय मजूर, स्थलांतरित लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी त्याने केलेल्या मदतीचा हा जणू सन्मान आहे.

[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/JoinSpreadit1 ]

Advertisement