SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛕 शिर्डी: साईबाबा मंदिरात जाताना ‘असे’ कपडे घातले तर दर्शन मिळणार नाही!

🙏 देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पोशाख बंधनकारक करण्यात आले असताना आता शिर्डीतील साईबाबा मंदिरातही भक्तांना पेहरावाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

🧐 सूचनांचे फलक-

Advertisement

▪️ ‘भाविकांनी आक्षेपार्ह पोशाख घालून दर्शनासाठी येऊ नये’, असे सूचना लिहिलेले फलक साईबाबा संस्थानकडून मंदिराच्या आवारात लावण्यात आले आहेत.

▪️ तोकडे कपडे परिधान केलेल्या भक्तांना दर्शन घेता येणार नाही. मंदिरात दर्शनासाठी जाताना पोशाख किमान पूर्ण शरीर झाकणारा असावा, असं सांगण्यात आलं आहे.

Advertisement

▪️ मात्र अनेक भक्तगण तोकडे कपडे घालून येथे येत असल्याच्या तक्रारी साई मंदिर प्रशासनाकडे काही भाविकांनी केल्या होत्या. त्यामुळे साई संस्थान व्यवस्थापनाने मंदिरात जाताना पेहराव कसा असावा याचे फलक लावले आहेत.

🤔 ‘हा’ निर्णय का?

Advertisement

देशविदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भक्त येतात. टाळेबंदीनंतर साई मंदिर खुले झाल्याने शिर्डीत गर्दी होत आहे. त्यामध्ये काही भक्त हे तोकडे कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आल्यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला असून, त्याबाबत सूचनांचे फलक जागोजागी लावले आहेत.

Advertisement