SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💥 शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या ‘त्या’ ऑफरबाबत उर्मिलाने केला मोठा खुलासा

🚩 प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या ऑफरबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

😳 ‘मला काँग्रेसने विधानपरिषदेसाठी विचारलं होतं. पद किंवा प्रतिष्ठेबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. पण वेगळ्या कारणांमुळे मी काँग्रेसची विधनापरिषदेची ऑफर नाकारली,’ असा खुलासा यावेळी मातोंडकर यांनी केला.

Advertisement

🧐 कसे होते उर्मिला मातोंडकर आणि काँग्रेसचे संबंध :-

👉 उर्मिला मतोंडकर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

Advertisement

✋ काँग्रेस पक्षाविषयी केले हे भाष्य :-

👉 मला काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली. माझी त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. लोकसभा लढवताना प्रचार करताना ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. त्यामुळे मी निवडणूक हरले.

Advertisement