SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😱 धक्कादायक : बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

😔 आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे.

💉 आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Advertisement

💥 काही दिवसांपूर्वी घडला होता हा प्रकार :-

👉 डॉ. शीतल यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं.

Advertisement

🧐 कोण होत्या डॉ. शीतल आमटे :-

👉 ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांची कन्या होत्या. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

Advertisement