SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक नगरचा बीएसएफ जवान ‘असा‘ अडकला हनी ट्रॅपमध्ये, पंजाबमध्ये झाली अटक

बाहेर देशातील गुप्तचर यंत्रणा सैन्याची अंतर्गत महिती काढण्यासाठी महिलांचा वापर करतात. या महिलाही मोठ्या खुबीने अत्यंत महत्वाची माहिती सहजपणे मिळवतात. आणि आपली माहिती लिक झाली आहे, याची सैन्याला भनकही नसते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरमधील एक BSF जवानाने थेट पाकिस्तानी महिला एजंटला मोठी गुप्त माहिती पुरवली आहे.

या घटनेबद्दल कळताच सदर जवानाला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश काळे असे या जवानाचे नाव असून तो नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील रहिवासी आहे. 2019 मध्ये त्याची पंजाबला पोस्टिंग झाली. दरम्यान सोशल मीडियावर त्याची एका महिलेशी ओळख झाली. त्या महिलेने तिचा फासा टाकला आणि हा जवान तिच्या जाळ्यात अडकला.

Advertisement

असा गुंतला जाळ्यात :-

काळे याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॅटसॅप ग्रूप तयार केला. नंतर कालांतराने त्याने या महिला एजंटला या ग्रुपमध्ये सामील केले. परिणामी प्रत्येक लोकेशन, प्रत्येक चर्चा या सगळ्याची माहिती या महिलेला सहजपणे मिळू लागली. धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट २०२० पासून हा प्रकार सुरू होता.
भविष्यात काय प्लॅन आहे, काय हालचाली आहेत, गस्त कोठे असणार आहे, याची बित्तंबातमी तिला कळू लागली.

Advertisement

दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर यायला नोव्हेंबरचा शेवट उजाडला. ही घटना लक्षात येताच बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि खरे समोर येताच काळे याला पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने काळे याला अटक केली. आता त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

कशी आहे काळेच्या घरची परिस्थिती :-

प्रकाश हा दहा वर्षांपूर्वी सरकारी सेवेत रुजू झाला. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही शेतकरी कुटुंबातील मुलगा बीएसएफमध्ये भरती झाल्याने सगळीकडे कौतुक होत होते. घरात आता आर्थिक सुबत्ता येऊ लागली होती. घरातही धार्मिक वातावरण असल्याने प्रकाश हा प्रामाणिक मुलगा असल्याचे गावकरी सांगत आहेत. तसेच त्याच्याकडून नकळतपणे हा प्रकार घडला असावा असाही अंदाज सांगितला जात आहे.

Advertisement

[ 📲 अशाच ब्रेकिंग न्यूज आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 जॉईन करण्यासाठी क्लिक करा  👉 https://bit.ly/JoinSpreadit1 ]

Advertisement