SpreadIt News | Digital Newspaper

😱 रणबीर आणि अलियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चं बजेट तब्बल एवढं, आकडा वाचून व्हाल थक्क!

0

🎥 ‘ब्रम्हास्त्र’च्या मेकर्सने खुलासा केला की, हा भारतात तयार झालेला सर्वात मोठा सिनेमा आहे. या सिनेमाला आधीच सर्वात मोठा सिनेमा म्हटलं जात आहे. जर सगळं काही ठीक झालं, तर पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होईल.

💰 ‘बजेट’ आणि स्टारकास्ट-

Advertisement

▪️ दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाचं बजेट तब्बल 300 कोटी रूपयांच्यावर गेलं आहे. सिनेमाच्या 300 कोटी बजेटवर त्याने सांगितले की, ‘बजेट कमी नाही पण यापेक्षा जास्तच झालं असेल.’

▪️ ब्रम्हास्त्र’ सिनेमाची स्टारकास्ट मंडळी- रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, अलिया भट्ट मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि अक्किनेनी नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसतील.

Advertisement

▪️ या सिनेमात रणबीर कपूर सुपर हिरोची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा तीन पार्टमध्ये बनवला जाईल.

📍 या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीनवर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली होती. दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला होता की, हा सिनेमा प्रेक्षकांना नवा आणि अद्भुत अनुभव देईल.

Advertisement