SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😇 गुरु नानक जयंती विशेष: शीख धर्माची स्थापना करणारे गुरु नानक यांच्याबद्दल जाणून घ्या या 10 गोष्टी..

🙏 गुरु नानक यांची आज 551 वी जयंती आहे. गुरु नानक जयंती कार्तिक पोर्णिमेला साजरी केली जाते. गुरु नानक शीखांचे पहिले गुरु होते. गुरु नानक यांचे अनुयायी त्यांना नानक, नानक देव जी, बाबा नानक आणि नानकशहा या नावांनीही संबोधित करतात.

💁🏻‍♂️ गुरु नानक यांच्या जीवनाशी संबंधित 10 गोष्टी-

Advertisement

1️⃣ नानक यांचा जन्म राय भोई की तलवंडी येथे झाला होता, हा भाग सध्या पाकिस्तानमध्ये येतो. त्यांचा जन्मदिवस गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो.

2️⃣ गुरु नानक यांची दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते.

Advertisement

3️⃣ गुरु नानक यांच्या वडिलांचे नाव मेहता कालू आणि आईचे नाव तृप्ता देवी होते. त्यांच्या बहिणीचे नाव नानकी होते.

4️⃣ गुरु नानक सुरुवातीपासून सांसारिक विषयांपासून उदासीन होते. ते आपला पूर्ण वेळ तपश्चर्या आणि आध्यात्मिक चिंतनात घालवत.

Advertisement

5️⃣ गुरु नानक लहान असताना अनेक चमत्कारिक घटना घडल्या, त्यानंतर गावकरी त्यांना दिव्य व्यक्ती मानू लागले.

6️⃣ गुरु नानकांनी सुरुवातीपासूनच रुढीवाद विरोधात संघर्ष सुरु केला.

Advertisement

7️⃣ धर्म प्रचारकांना त्यांच्या चुका सांगण्यासाठी नानकांनी अनेक तीर्थस्थळांना भेट दिली.

8️⃣ गुरु नानकांचा विवाह 1487 मध्ये झाला. त्यांना दोन मुले होती, ज्यांचे नाव श्रीचन्द आणि लक्ष्मीचन्द होते.

Advertisement

9️⃣ गुरु नानक म्हणायचे ईश्वर एकच आहे. मूर्तीपूजा आणि अनेक देवांच्या उपासनेला त्यांनी अनावश्यक ठरवले.

🔟 गुरु नानकांचे म्हणणे होते की, ईश्वर माणसाच्या हृदयामध्ये राहतो. हृदयात निर्दयता, निंदा, द्वेष, राग इत्यादी विकार असल्यास अशा हृदयामध्ये परमात्मा कधीही विराजमान होणार नाहीत.

Advertisement