SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🆔 रंगीत व्होटर आयडी हवंय? मग ऑनलाईन अप्लाय करा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

💡 आपल्यासाठी मतदार ओळखपत्र हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो.

✅ आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे.

Advertisement

👉 रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर जाणून घ्या

1️⃣ नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) च्या वेबसाईटवर जा

Advertisement

2️⃣ व्होटर पोर्टल बॉक्सवर क्लिक करा, पेजवर स्वतःचं रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला नवीन अकाऊट बनवावं लागेल.

3️⃣ रजिस्ट्रेशननंतरच्या पेजवरील फॉर्म 6 भरा. इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि इतर माहिती द्यावी लागेल.

Advertisement

4️⃣ माहिती भरुन झाल्यानंतर एकदा फॉर्म तपासा आणि खाली दिलेल्या सबमिट बटणवर क्लिक करा.

🟣 मतदान यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ओळखपत्रांच्या आधारे मतदानाचा हक्क बजावता येतो.

Advertisement