SpreadIt News | Digital Newspaper

मुंबई वगळता राज्यातील शाळा व महाविद्यालये 23 नोव्हेंबरपासून होणार सुरु

0

◼️मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.

◼️ या संदर्भातील आदेश महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले असून आता मुंबईतील शाळा थेट नवीन वर्षीच उघडल्या जाणार आहेत.

Advertisement

◼️ निर्णयाबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, मी स्थानिक प्रशासनावरच आपापल्या हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय हा सोडला होता. सकाळी माझी या विषयावर मुंबई महापालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली. त्यानंतर मुंबई हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

◼️ शाळा 23 नोव्हेंबरला सुरु कराव्यात. ज्या ठिकाणी अद्याप तयारी झालेली नाही त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.

Advertisement

◼️ कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला असून दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता स्प्रेडइट तुमच्या मित्रांना रेफर करा आणि Paytm कॅश मिळवा, त्यासाठी आमचे रेफरल अ‍ॅप डाऊनलोड करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.promoters

Advertisement