SpreadIt News | Digital Newspaper

या कारणामुळे दात होतात पिवळे, वेळीच व्हा सावध.!

0

😬 माणसाचे दात हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. दात पांढरे करण्यासाठी अनेक उत्पादने विक्रीस आहे परंतु दातांना पिवळेपणा का येतो ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अचानक दात पिवळे होतात आणि यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील फरक पडतो

🤢 दातांना पिवळेपणा नेमका का येतो?-

Advertisement

▪️ सर्वप्रथम हि समस्या अनुवंशिक देखील असू शकते, कारण घरातील पूर्वजांचे दात पिवळे असतील तर आपले देखील दात पिवळे होऊ शकतात. दातावरील बाह्य स्तर पातळ असेल तर दाताचा पिवळेपणा दिसतो.

▪️ वयानुसार दाताचा इनॅमलचा स्तर हा पातळ होतो त्यामुळे देखील दातांना पिवळेपणा येऊ शकतो. वय देखील दाताकरता एक महत्वाचा मुद्दा आहे.

Advertisement

▪️ कॉफी, चहा, तंबाखु इत्यादी गोष्टीमुळे देखील दातांना पिवळेपणा येतो, त्यामुळे दिवसातून दोनदा घासणे आवश्यक आहे. दातावर कीड जमा झाल्याने देखील दात पिवळे होऊ शकतात.

▪️ दातांमध्ये चांदी भरल्याने देखील दात पिवळे पडतात. केमोथेरपी मध्ये देखील दात पिवळे पडतात. तसेच गर्भवती स्त्रीला आजार किंवा संसर्ग झाल्यास बाळाच्या दातावर त्याचा कालांतराने परिणाम जाणवतो.

Advertisement

▪️ अन्नपदार्थ देखील दात पिवळे होण्यास कारणीभूत ठरू शकतात. चहा, कॉफी, कोला, चेरी, ब्लुबेरी, सफरचंद आणि बटाटे खाल्ल्याने देखील दात पिवळे होतात. या पदार्थामुळे दातावरील इनॅमल स्तर कमी होतो.

▪️ पाण्यामधून फ्लोराईड हा घटक नेहमी शरीरात गेल्यास दात पिवळे होतात. लहान मुलांनी टुथपेस्ट किंवा फ्लोराईडयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास दात पिवळे होतात.

Advertisement

📍 टीप- या माहीतीच्या आधारे तुम्हाला अंदाज येईल दातांची वेळीच स्वच्छता ठेवणं आणि काळजी घेणं किती महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण दातांच्या समस्यांचं निदान करून आरोग्य तज्ज्ञांकडून योग्य तो सल्ला घेऊनच उपचार करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता स्प्रेडइट तुमच्या मित्रांना रेफर करा आणि Paytm कॅश मिळवा, त्यासाठी आमचे रेफरल अ‍ॅप डाऊनलोड करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.promoters

Advertisement