SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😷 गूगल मॅप्स देणार सार्वजनिक ठिकाणांवरील कोरोना संक्रमितांची लाइव्ह डिटेल

💁🏻‍♂️ गूगल मॅप्समध्ये नवीन फीचर्स आणले आहे. कंपनीने मॅप्समध्ये गूगल असिस्टंट ड्राईव्हिंग मोड हे नवीन फीचर आणले आहे. या मोडमधून अँड्रॉयड आणि आयओएस यूजर्सला रियल टाइममध्ये कोविडशी संबंधित अचूक माहिती मिळेल.

🧐 या नवीन फीचरनुसार,

Advertisement

📍 जर तुम्ही घराबाहेर निघालात आणि तुम्हाला पब्लिक प्लेसला जायचे असेल किंवा पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणच्या कोविड संक्रमितांची माहिती आधी मिळेल.

📍 गूगल मॅप्स यूजरला गर्दीच्या ठिकाणांची रिअल टाईम इन्फॉर्मेशन देईल. तर, मागच्या 7 दिवसातील कोरोना रुग्णांची संपूर्ण माहितीदेखील देईल.

Advertisement

📍 गूगलने सांगितले की, या नवीन फीचरच्या मदतीने लोकल अथॉरिटीची गाईडलाइंस, टेस्टिंग साईट आणि लिंकची माहितीदेखील दिली जाईल.

📍 एखाद्या स्पेसिफिक एरियाच्या ऑल टाइम डिटेक्ट केसची माहिती ऑफिशियल सोर्सकडून मिळेल.

Advertisement

📍 यूजर्स डिलीव्हरी ऑर्डरचे लाइव्ह स्टेटसदेखील पाहू शकतील. हे फीचर तुम्हाला संभावित ऑर्डरचा डिलीव्हरी टाईम, पिकअप टाईम याबाबत माहिती देईल.

📍 कंपनीने या फीचरला अँड्रॉइड आणि आयओएस यूजरसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेत लागू केले आहे.

Advertisement