SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💰 इलॉन मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत; एका दिवसात संपत्तीत 50 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ

📌 स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख असलेले इलॉन मस्क आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.

🚀 अलीकडेच त्यांच्या रॉकेट कंपनीने अंतराळात चार अंतराळवीर पाठवले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा एसएंडपी 500 कंपनीच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

🎯 ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीमध्ये 185 अब्ज डॉलर्ससह जेफ बेझोस दुसर्‍या क्रमांकावर, 129 अब्ज डॉलर्ससह बिल गेट्स दुसर्‍या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर 110 अब्ज डॉलर्ससह इलॉन मस्क आहेत.

📲 टेस्लाबद्दल आलेल्या बातमीनंतर एका दिवसात इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 7.61 अब्ज डॉलर्स (50 हजार कोटींपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. आतापर्यंत त्यांची संपत्ती वार्षिक आधारावर 82 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

Advertisement

📈 यावर्षी मस्क यांची संपत्ती सर्वाधिक वाढली आहे. वार्षिक मालमत्ता वाढीच्या बाबतीत ते पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. यावर्षी आतापर्यंत त्यांची संपत्ती सुमारे 70 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

Advertisement