SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सॅमसंग लाँच करणार जगातील पहिला स्ट्रेचेबल स्मार्टफोन

📳 सॅमसंगने यापूर्वीच आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची दुसरी जनरेशन बाजारात आणली आहे. आता कंपनी आपल्या स्ट्रेचेबल फोनबद्दल चर्चेत आहे. दक्षिण कोरियामध्ये कंपनीचे अध्यक्ष ली जै योंग यांच्याकडे हा रहस्यमय फोन दिसला.

💁🏻‍♂️ कोरिया टाइम्सच्या म्हणण्यानुसार,

Advertisement

▪️ सॅमसंगने जागतिक बाजारात प्रथम स्ट्रेचेबल स्मार्टफोन लाँच करण्यासाठी पेटंट राईटसाठी नाव नोंदवले आहे. पुढील वर्षी कंपनी जगातील पहिला स्ट्रेचेबल फोन बाजारात आणू शकते.

▪️ 6 इंचाचा हा स्ट्रेचेबल स्मार्टफोन 8 इंच (ताणून) पर्यंत खेचला जाऊ शकतो. याचा डिस्प्ले गरजेनुसार मोठा आणि लहान केला जाऊ शकतो.

Advertisement

▪️ स्ट्रेचेबल फोनमुळे फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये दिसणार्‍या क्रीज मार्कची समस्यादेखील सोडवली जाईल आणि यामुळे त्याचे ब्रेकडाऊन कमी होईल.

✔️ ‘असा’ असेल स्ट्रेचेबल स्मार्टफोन– पेटंटमध्ये सांगितल्यानुसार, स्ट्रेचेबल स्मार्टफोन बाजूने अत्यंत बारीक असेल. या फोनला लांब स्क्रीन असेल, जी फोनमध्येच फोल्ड होऊ शकते. त्याचे वर्णन लहान आकाराचे आणि कॉम्पॅक्ट स्मार्टफोन म्हणून केले गेले आहे. अ‍ॅप आणि मीडियाला मोठ्या स्क्रीनवर अधिक उपयुक्त मानलं जात असल्यामुळे प्रॉडक्शन व्हर्जन थोडं मोठं असू शकतं.

Advertisement