SpreadIt News | Digital Newspaper

भारत बायोटेकच्या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

0

👌 भारत बायोटेकची कोरोनावरील लसीची (कोवॅक्सिन) तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. कंपनीने कोरोनावरील लसीसाठी आयसीएमआरसोबत भागीदारी केली आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे.

🧐 भारत बायोटेकची तिसरी चाचणी

Advertisement

▪️ भारत बायोटेकने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचं अंतरिम विश्लेषण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर 26,000 स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे, असं गेल्या महिन्यात कंपनीने म्हटलं होतं.

▪️ लसीच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी कंपनीने 2 ऑक्टोबरला भारतीय औषध नियंत्रकाकडून (DCGI) परवानगी मागितली होती. त्याचबरोबर कंपनीची ‘नाकातून ड्रॉपच्या रूपात दिली जाणारी’ आणखी एक लस पुढील वर्षापर्यंत तयार होईल, अशी माहिती आहे.

Advertisement

👨‍🔬 अमेरिकेतील ‘ही’ लस 94.5% प्रभावी
मॉडर्ना’ची कोरोनावरील लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे क्लिनिकल चाचणीच्या प्रारंभिक डेटाच्या आधारे सिद्ध झालं आहे, असा मॉडर्नाने दावा केला आहे. यापूर्वी फायझर कंपनीनेही आपली लस 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. तर बहुतेक तज्ज्ञांनी या लसी 50 ते 60 टक्के यशस्वी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Advertisement