SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विठुरायाचं दर्शन घ्यायला जाताय? मग ‘या’ नियमावलीचं पालन करा

👏 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता पासून भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

👥 श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज 1,000 भाविकांना सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता 2,000 भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

🔰 भाविकांसाठी नियमावली

▪️ सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार.
▪️ प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरता सोडणार
▪️ दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक.
▪️ भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे, बुकींग 8 दिवसापर्यंत करता येईल.
▪️ मुख दर्शनाकरिता कासार घाट येथे पास तपासणी करून दर्शनाला सोडले जाणार
▪️ कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना दर्शन प्रवेश दिला जाणार नाही.
▪️ मंदिराच्या पूर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील.
▪️ दर्शन रांगेत फिजिकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फूट अंतर) ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे.
▪️ अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील.
▪️ 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे.

Advertisement