SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

❗ ब्रेकिंग: भाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात

✊ पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं आहे.

🧐 प्रकरण ‘असं’ आहे..

Advertisement

▪️ राम कदम यांनी बुधवारी सकाळी 8.30 वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं.

▪️ पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

Advertisement

▪️ यावर “पोलिसांची ही कारवाई दुर्देवी असून सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे’, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

👇 ‘या’ प्रकरणाचं मूळ

Advertisement

16 एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या 2 साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 154 जणांना अटक केली असून 11 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच 5 पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून 30 हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

Advertisement