SpreadIt News | Digital Newspaper

KBC – तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असतं, तर तुम्ही जिंकले असते 7 कोटी.!

0

🤝 भारतातील अधिक चर्चेत असणारा क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 12 व्या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. अखेर आता या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. या सीझनच्या पहिल्या करोडपती स्पर्धक ‘नाजिया नसीम’ बनल्या आहेत.

👸 कौन बनेगा करोडपतीच्या 12 हंगामातील नजिया नसीम या सीझनमध्ये करोडपती बनणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहे. बुधवारी झालेल्या भागात त्यांनी एका प्रश्नाचं 1 कोटी रुपये जिंकले. यानंतर या कार्यक्रमाचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नजिया यांना 7 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारला. हा 16 वा प्रश्न होता.

Advertisement

🤨 पण झालं असं की, नजिया या 16 व्या प्रश्नाच्या उत्तरावर ठाम नव्हत्या, त्या विचारात पडल्या. त्यांच्याकडे कोणती लाईफलाईन पण शिल्लक नव्हती. यामुळे उत्तर न आल्याने त्यांनी या खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जर नाजिया यांनी या प्रश्नाचंही उत्तर बरोबर दिलं असतं, तर त्यांनी नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केला असता.

💁🏻‍♂️ ‘तो’ 7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न होता..

Advertisement

▪️ प्रश्न : नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये कोठे पहिल्यांदा आजाद हिंद सेनेची की घोषणा केली होती ?
¶ अ. कैथे सिनेमा हॉल
¶ ब. फोर्ट कैनिंग पार्ट
¶ क. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर
¶ ड. नॅशनल गॅलरी सिंगापूर

➡️ उत्तर : कैथे सिनेमा हॉल

Advertisement

🤗 नजिया यांनी या खेळातून माघार घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नजिया यांच्याकडून त्यांचे उत्तर ऐकण्याची विनंती केली. यावर नजिया यांनी त्यांचे उत्तर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर असं उत्तर दिलं. मग अमिताभ बच्चन यांनी हे उत्तर चुकीचे आहे, असं सांगून योग्य उत्तर ‘कैथे सिनेमा हॉल’ असल्याचं सांगितलं

💁🏻‍♂️ ‘हा’ होता नजिया यांना करोडपती (1कोटी मिळवून देणारा) बनवणारा प्रश्न-

Advertisement

▪️ प्रश्न : यापैकी कोणत्या अभिनेत्रीने सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जिंकला होता?
¶ अ. दीपिका चिखलिया
¶ ब. रुपा गांगुली
¶ क. नीना गुप्ता
¶ ड. किरण खेर

➡️ उत्तर : रुपा गांगुली

Advertisement