SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महिला बँक मॅनेजरनेच दिली प्रियकराची सुपारी; पोलिसांनी या स्थितीत केले अटक!

👮🏻 मुंबईमध्ये माटुंगा पोलिसांनी एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला आपल्या प्रियकराची सुपारी देताना रंगेहात पकडलं आहे. अटक केलेल्या या आरोपी महिलेचा प्रियकर मुंबई महानगरपालिकेच्या एका वॉर्ड ऑफिसमध्ये सब इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. समजा, पोलिसांना जर थोडाही उशीर झाला असता तर सब इंजिनीयरची आत्तापर्यंत हत्या झाली असती; पण पोलिसांच्या प्रसंगवधाने ही घटना टळली.

👨‍🔬 ज्याला प्रियकराची हत्या करण्याची सुपारी दिली तो केमिस्ट्रीमध्ये बीएससी आहे तर ज्याला मारणार होते तो मुंबई महानगरपालिकेमध्ये सब इंजिनियर पदावर कार्यरत आहे. महत्वाचं म्हणजे तिघेही उच्चशिक्षित आहेत. आरोपी महिला मुंबईच्या नामवंत बँकेमध्ये गेल्या 4 वर्षापासून असिस्टंट मॅनेजर असून, या धक्कादायक कृत्यामुळे तिच्या धाडसावरूनही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Advertisement

🧐 ही सर्व घटना घडण्यामागचं मूळ कारण-

मॅनेजर आणि सब इंजिनियर या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र दोघांचंही लग्न झालं होतं. लग्नानंतर सुद्धा इंजिनियरने आपल्याशी प्रेमसंबंध ठेवावा म्हणून ही मॅनेजर त्याच्या पाठीमागे लागली होती. सुरुवातीला काही दिवस असेच गेले, मात्र या प्रकाराला कंटाळून या इंजिनिअरने मॅनेजरला ब्लॉक केलं आणि सगळे संपर्क बंद करून टाकले. मग काही केल्या त्या महिला मानेजरचा संपर्क होईना!

Advertisement

👁‍🗨 ..आणि मग असा रचला गेला हत्येचा कट-

▪️ महिला मॅनेजरला या दुर्लक्ष करण्याच्या गोष्टींचा प्रचंड राग आला आणि तिची तळपायाची आग मास्तकातच गेली असे चित्र स्पष्ट होते. मग तिने सूडाची भावना डोक्यात धरून ओरीसामधील एका कॉन्ट्रॅक्ट किलरला तब्बल 1 लाख रुपयांची सुपारी देऊन इंजिनीअरची हत्या करण्यासाठी कट रचण्यास सुरुवात केली.

Advertisement

▪️ डील फिक्स होताच, रविवारी ओरिसाचा हा सुपारी किलर दादर स्टेशन येथे आला. भेटण्याचं कारणही तसंच होतं, कारण भेटल्यावर ती मॅनेजर त्याला सब इंजिनियरची हत्या करण्यासाठी एक बंदूक आणि 5 गोळ्या देणार होती.

▪️ परंतु, या सगळ्या घडामोडीवर माटुंगा पोलीस लक्ष ठेवून होते, असं म्हणता येईल. कारण या माटुंगा पोलीसांनी त्याच वेळेस त्या आरोपी महिलेला व ओरिसाच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला ताबडतोब अटक केली.

Advertisement

▪️ ही आरोपी महिला असिस्टंट मॅनेजर आणि तो सब इंजिनियर या दोघांचंही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आले आणि बोलणं-चालणं होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

▪️ पण काही दिवसानंतर अचानक सब इंजिनीयरला हे विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणं जड जाऊ लागलं, ज्यामुळे त्याने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र या महिला मॅनेजरने यासाठी स्पष्ट नकार दिला आणि हे नातं सुरू ठेवण्यास तिने आणखी जोर लावला, पण इंजिनियर आपल्या मतावर ठाम होता आणि त्याने तिला ब्लॉक केले.

Advertisement

❓ आपण असे सतत दुर्लक्षित होतोय, याचाच राग आणि विचार सतत त्या महिला मॅनेजरच्या मनात होता. पण ही महिला हत्येची सुपारी देण्यापर्यंत का पोहोचली ? महिला मॅनेजरने त्या किलरशी संबंध कसे? यामागे अनेक धागेदोरे आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहे. तसेच मुख्य म्हणजे बंदुक आणि गोळ्या महिला मॅनेजरला कोणी आणि कुठून आणून दिले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Advertisement