SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माधव पाटलांनी वयाच्या 66व्या वर्षी का केलं लग्न?

सध्या सोशल मीडियावर वयस्कर असणारे माधव पाटील यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. वयाच्या 66 व्या वर्षी लग्न केल्याने फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरुन त्यांची खिल्लीही उडवली जात आहे.

👀 झालं असं की..

Advertisement

▪️ उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. त्यामुळे रायगडमध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांनी म्हातारपणात लग्न केल्यामुळे ते खूपच चर्चेत आले आहेत.

▪️ माधवराव तरुण असताना जेव्हा लग्न करण्याचा एक पायरी मागे म्हणजेच साखरपुडा करण्याच्या तयारीत असताना काही कारणास्तव अचानक त्यांचा साखरपुडा मोडला.

Advertisement

▪️ यानंतर साधे, सरळ व संयमी स्वभावाच्या माधवरावांनी मात्र आयुष्यभर लग्न न करण्याचं मनात पक्कं केलं. आयुष्यभर त्यांचे कुटूंब, नातेवाईक लग्न करण्यासाठी विनवणी करत होते, मात्र तेव्हा त्यांनी हा विषय बाजूला केला व तो आजपर्यंत प्रलंबितच होता.

👫🏻 यंदा कर्तव्य आहेच..

Advertisement

🔰 गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने असेच एक दिवस माधव पाटील यांच्या मनात सहज विचार आला. कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून माधव यांना एकटेपणा असल्याचं जाणवत होतं.

🔰 त्यावेळी आपल्याला कोणीतरी पुढील आयुष्य घालविण्यासाठी सोबती असावी अस वाटू लागलं. मग त्यांनी आपला लग्न न करण्याचा विचार बदलला आणि लग्नाचा बार उडवायचं ठरवलं.

Advertisement

🔰 मग काय माधवरावांनी कहरच करत वयाच्या 66 व्या वर्षी लग्न करण्याचं ठरवलं, कारण त्यांच्या आईचे वय 88 असल्यामुळे त्यांचा घरात कोणीतरी सांभाळ करणारा असावा, यातून त्यांनी संजना नावाच्या महिलेशी लग्न केलं.

🔰 संजनाचं याआधी ही लग्न झालेलं आहे. घटस्फोटीत असलेल्या संजनाचं वय 45 असून त्यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाल्याने आधार हरपला होता. महत्वाचं म्हणजे लग्नानंतर माधवरावांनी आपल्या पत्नीच्या कुटुंबालाही मोठा आधार देत जबाबदारी स्विकारली आहे. अशावेळी संजनानेही वयाने 20 वर्षे मोठ्या असलेल्या माधव यांच्याशी लग्न करण्यास ‘हो’ कळवलं.

Advertisement

🔰 सोशल मीडियावर सध्या माधव पाटील यांची टिंगल-टवाळी केली जात आहे. मात्र त्यांना त्याची पर्वा नाही. ‘ समाजासाठी 35-40 वर्ष सेवा करून पत्रकारिता, समाजकारण, राजकारण करून अखेर पदरात टीकाच पडत असेल तर ती सहन करायला मी समर्थ आहे’, असे स्पष्ट मत माधव पाटील यांनी व्यक्त केले.

Advertisement