SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नशीबच फुटके – IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हा’ खेळाडू फ्री हीटवर रनआऊट

बॉलरने नो बॉल टाकल्यानंतर पुढचा बॉल हा फ्री हिट असतो म्हणजेच बॅट्समन रनआऊट सोडून कसचं आउट होऊ शकत नाही.

या फ्री हिटचा प्रत्येकच खेळाडू मनापासून आनंद घेतो आणि शक्यतो मोठाच शॉट मारतो. परंतु, आरसीबी आणि हैदराबाद सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एक घटना घडली आहे. फलंदाजाचे नशीब इतके वाईट होत कि तो चक्क फ्रि हिटवर रनआऊट झाला. तो फलंदाज होता आरसीबीचा मोईन अली.

Advertisement

मोईन अली असा झाला आउट:

आरसीबीच्या इनिंग दरम्यान 11 व्या ओव्हरमध्ये चौथा बॉल फ्री हिट होता. एबी डिव्हिलियर्सला शाहबाज नदीपच्या नो बॉलवर मोठा शॉट खेळता आला नाही. तो फक्त एक रन घेऊ शकला. त्यानंतर मोईन अली फ्री हिटवर खेळणार होता. त्याने शॉट मारला पण तो सरळ राशिद खानच्या हातात गेला. त्याने बॉल स्टंपवर थ्रो केला आणि मोईन अली रन आऊट झाला.

Advertisement

आयपीएलच्या इतिहासात, मोईन अली आपल्या खेळीच्या पहिल्याच चेंडूवर फ्री हिटवर रनआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. इंग्लंडचा हा खेळाडू शुन्यावर आऊट झाला.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार कोहली केवळ 6 धावा करून बाद झाला. एबी डिव्हिलियर्सने अर्धशतक झळकावले. संघाला मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाही. एबीने आयपीएल कारकिर्दीतील आपले 41 वे अर्धशतक झळकावले.

Advertisement