SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोहित शर्माच्या नावे झाला नकोसा असलेला ‘हा’ विक्रम..

🏏 दरवर्षी आयपीएलमध्ये आपल्याला अनेक अंगावर शहारे आणणारे सामने पाहायला मिळतात. याशिवाय आयपीएलमध्ये चौकार-षटकार आणि अनेक मोठे विक्रम आहेत. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात वेगवेगळे छोटे-मोठे विक्रम केले जातात आणि तोडलेही जातात.

Advertisement

💁🏻‍♂️ यात काही वेळेस नकोसे विक्रमही झालेले पहायला मिळतात. यातील एक विक्रम म्हणजे फलंदाज शुन्यावर बाद होणे. टी-20 क्रिकेट असा एक फॉरमॅट आहे की, जिथे तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असतं. फलंदाजाला येताच त्याला मोठे फटके मारावे लागतात, त्यामुळे लवकर बाद होण्याचा शक्यता जास्त असते. त्याचमुळे खूप खेळाडू शुन्यावर बाद होतात.

👉 क्रिकेटचे सर्वच फॉरमॅट गाजवणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर असाही विक्रम- रोहित शर्माचा धडाकेबाज फॉर्म यंदाच्या आयपीएलमध्ये चांगला राहिला नाही. रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफ, सेमीफायनल मध्ये खास असे परफॉर्मन्स करू शकला नाही.

Advertisement

0️⃣ काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद होऊन ‘गोल्डन डक’ चा शिकार झाला. रोहित अश्विनचा ओव्हरच्या पहिल्याच चेंडूत स्पिनर शिकार बनला. एलबीडब्ल्यू बाद होऊन रोहित शर्मा पॅवेलियनमध्ये परतला.

🧐 रोहितच्या ‘गोल्डन डक’ विषयी..

Advertisement

▪️ रोहित शर्मा आतापर्यंत तब्बल 13 वेळा एकही धावा न करता आऊट झाला आहे. असे बाद होऊन रोहितने हरभजन सिंह आणि पार्थिव पटेलची बरोबरी केली आहे.

▪️ आयपीएलमध्ये रोहित चौथ्यांदा पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर बाद (गोल्डन डकवर) झाला आहे. त्याला आत्तापर्यंत उमेश यादव, जोफ्रा आर्चर आणि आर अश्विन यांनी त्याला गोल्डन डकवर बाद केले आहे.

Advertisement

▪️ महत्वाचं म्हणजे, आयपीएलमध्ये 2018 च्या आधी रोहित कधीही गोल्डन डकवर बाद झाला नव्हता. पण 2018 नंतर तो 4 वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.

▪️ भज्जी आणि पार्थिव असे खेळाडू आहेत जे देखील 13-13 वेळा शून्यावर बाद होऊन ‘डक’ चे शिकार झाले आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, मनीष पांडेही मागे नाहीत.

Advertisement