SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आमच्या येथे 1000 रुपयांत धमकी तर 5000 रुपयांत मारहाण करुन मिळेल’, वाचा काय आहे प्रकार..

💬 सोशल मीडियाचा वापर चांगलाही आहे तर वाईटही आहे. आजकाल याचा वापर सर्वच बाबतीत अधिकच वाढला आहे. खासगी असू वा व्यावसायिक सगळ्या बाबतीत सोशल मीडियाचं महत्वाचं योगदान राहिलं आहे.

⚡ पण, याचा चुकीच्या मार्गांनीही वापर केला गेला. सध्या याचंच एक उदाहरण व्हायरल पोस्टच्या माध्यमातून दिसलं आहे.

Advertisement

 जाहिरातीतून नेमकं काय स्पष्ट होतंय?

▪️ उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे एका तरुणांच्या गँगनं चक्क गुन्हेगारी सेवा देण्यासाठी त्यांचं रेटकार्डच प्रसिद्ध केल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisement

▪️ जाहिरातीत दाखवल्यानुसार, ‘धमकी देण्यासाठी 1000 रुपये, मारहाण करण्यासाठी 5000 रुपये, कोणा एकाला जखमी करण्यासाठी 10,000 रुपये आणि हत्या करण्यासाठी 55, 000 रुपये आकारले जातील’, असा स्पष्ट उल्लेख करण्य़ात आला आहे.

▪️ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास केला असता हा युवक चौकाडा गावचा असल्याची खबर लागल्यावर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पाऊलं उचलली जाण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

 ‘या’ अजब प्रकाराविषयी सविस्तर..

📌 अपलोड करण्यात आलेल्य़ा काही फोटोंपैकी एकामध्ये तरुण पिस्तुल पकडलेल्या पोझमध्ये दिसत आहे. सोबतच धमकी, मारहाण, मर्डर अशा सेवांसाठी किती पैसे आकारले जातात याचे दरही तिथे कळत आहे.

Advertisement

📌 या अजब प्रकाराने सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारे खुलेआम अजब जाहिरातबाजी करण्याचं धाडस दाखवणाऱ्या या व्यक्तीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

📌 कारण यामध्ये धमकी मारहाणीसोबतच कोणाचा तरी जीव घेण्याचं कामही स्वीकारलं जाण्याबाबतची एक प्रकारे जाहिरात करण्यात आली आहे.

Advertisement