SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

या 15 युक्तिवादामुळे अर्णब गोस्वामींना मिळाली 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

👮🏻 रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली. गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा अशा दोन आरोपींनासुद्धा अलिबागच्या सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Advertisement

📜 दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं मत मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिलेला आहे. पण, कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही, आरोपींचे वकील सुशील पाटील यांनी ही अशी माहिती दिली आहे.

 

Advertisement

👉 काल बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.

 

Advertisement

👁️ कोर्टात सरकारी वकिलांनी मांडलेले ‘ते’ 15 युक्तीवाद- 

 

Advertisement

▪️अर्णब गोस्वामी न्यूज चॅनलचे संपादक आहेत व त्यांचा सामान्यांवर प्रभाव आहे.

 

Advertisement

▪️ आर्किटेक्ट अन्वय नाईक यांची आत्महत्तेपूर्वीची चिठ्ठी जबानी म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. आरोपींच्या कंपन्यांच्या भागिदारीची कागदपत्र प्राप्त कराव्याची आहेत

 

Advertisement

▪️ नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा तपास करावयाचा आहे. त्यावेळी अर्णब गोस्वामी पोलीस कोठडीत असणे गरजेचं आहे. अन्यथा साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो.

 

Advertisement

▪️ या गुन्ह्यांत नवीन तपासामध्ये योग्य अशी माहिती मिळाली आहे. त्याचा तपास करायचा आहे.

 

Advertisement

▪️ याआधी केलेल्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामं आरोपींनी पूर्ण करून घेतली याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे या वेंडर्सचा तपास करून त्यांना अटक करायची आहे.

 

Advertisement

▪️ जी कामं केली आहेत, त्याविषयीची कागदपत्र जप्त करायची आहेत.

 

Advertisement

▪️ वर्क ऑर्डरपेक्षा जास्त काम केलं असल्याचं साक्षीदारांचं म्हणणं असून, याचाही तपास करायचा आहे.

 

Advertisement

▪️ अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही, असा आरोपींचा दावा आहे. त्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.

 

Advertisement

▪️ नवीन तपासात काही कंपन्यांचे बॅंक खाते नंबर मिळाले आहेत. त्यात आणखी काही बँक खाते आहेत का, याची शहानिशा करायची आहे.

 

Advertisement

▪️ काही साक्षीदारांचे 164 CRPC अंतर्गत जबाब नोंदवायचे आहेत. त्यासाठी गोस्वामी यांना पोलीस कोठडी गरजेची आहे.

 

Advertisement

▪️ आरोपींकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत का, याचा तपास बाकी आहे.

 

Advertisement

▪️ आरोपींनी सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत अन्वय नाईक यांची किंवा त्यांच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आल्या आहेत. याचा तपास पोलीस कोठडीत करायचा आहे.

 

Advertisement

▪️ वादग्रस्त रक्कमेचा प्रश्न सोडवण्यासाठी आरोपी यांच्याकडून पक्के असे प्रयत्न नाहीत. त्यामुळे मयत अन्वय नाईक मानसिक दबावाखाली होते, अशी साक्षीदारांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे मयत अन्वय नाईक यांच्यावर आत्महत्या करण्यायोग्य परिस्थिती घडवून आणली व नंतर अन्वय नाईक यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची आहे.

 

Advertisement

▪️ मयत अन्वय नाईक यांच्या मुलीला जबरदस्तीने पैसे घेऊन तक्रारी बंद कराव्यात यासाठी धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना नोटीस बजावलेली आहे.

 

Advertisement

▪️ त्यावेळच्या तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये अनेक उणीवा आढळल्या. फौजदारी प्रक्रिया संहितेचे उल्लंघन या कारणासाठी “अ समरी” अहवालावर फिर्यादीने आक्षेप घेतला व तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं तपासात आढळून आलं आहे.

 

Advertisement

🔎 15 ऑक्टोबर 2020 पासून नव्याने तपास-

 

Advertisement

🔰 रायगड पोलिसांनी या प्रकरणी 15 ऑक्टोबरपासून पुन्हा नवीन तपास सुरू केला आहे. त्यांनी फिर्यादी अक्षता नाईक यांचा जबाब नोंदवून नाईक यांच्या कंपनीचा महत्त्वाच्या वेंडर असलेल्या व्यक्तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

 

Advertisement

🔰 या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 साक्षीदारांना तपासासाठी नोटीस बजावली आहे. तपासातील काही साक्षीदारांनी दिलेली माहिती सकारात्मक असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.

 

Advertisement

🔰 नाईक यांच्या लॅपटॉपमधील फाईल्सची तपासणी सुरू असून त्यात 1 लाख पेक्षा जास्त फाईल्स असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या आणि आरोपींच्या बॅंक खात्यांचीही चौकशी सुरू आहे.याविषयी अधिक वेगाने तपास चालू आहे.

Advertisement