SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन, सोनी टीव्ही विरोधात गुन्हा दाखल!

💰 सोनी वाहिनीवर प्रसारित होणारा सर्वात लोकप्रिय शो असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ आणि या शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन अडचणीत सापडले आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे. 

🧐 सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातून हिंदू व बौद्ध धर्मियांच्या भावनांना हानी पोहोचवली गेली आहे. यावरून आमदार अभिमन्यू पवार यांनी लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

Advertisement

🤨 प्रकरण ‘असं’ आहे..

📖 कौन बनेगा करोडपती शोमध्ये 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायींनी कोणत्या धर्मग्रंथांच्या प्रति जाळल्या होत्या?’ असा प्रश्न स्पर्धकाला विचारण्यात आला होता.

Advertisement

▪️ या प्रश्नाच्या उत्तरासाठी-

A) विष्णु पुराण
B) भगवत गीता
C) ऋग्वेद
D) मनु स्मृति – असे 4 पर्याय देण्यात आले होते.

Advertisement

⚡ या एका प्रश्नावरून हिंदू धर्मियांच्या भावनांना तडा गेल्याचं कळतंय. जगात अनेक धर्म आहेत, आणि त्याविषयीची प्रत्येकाची भावना, श्रद्धा ही अतूट असते. ही ऐतिहासीक ग्रंथांमधील श्रद्धेची भावना दुखावली गेल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

👏 विष्णु पुराण, भगवत गीता, ऋग्वेद यांचा संदर्भ प्रश्नात दिल्याने असलेले नेटिझन्स भडकले. या चारही ग्रंथांबद्दल सर्वधर्मीय लोकांच्या मनात श्रद्धेची भावना आहे. यामुळे सोनी टीव्हीवरील या प्रसिद्ध ‘शो’ ला टीकेचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

🤜 यावरून अनेकांनी सोनी टिव्ही वाहिनी व अमिताभ यांच्यावर सोशल मिडियावरही टीका केली. त्यामुळे कौन बनेगा करोडपती आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

😞 या मुद्द्यावरून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सोनी पिक्चर्स नेटवर्क लिमिटेड तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी आमदार अभिमन्यू पवार यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शो चे सूत्रसंचालक, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि केबीसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये सामाजिक कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि अभिनेते अनूप सोनी अतिथी म्हणून आले होते.

Advertisement