SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ज्या खेळाडूला 2019मध्ये खाली बसवलं, तोच ठरला IPL 2020 मध्ये RCB चा किंगमेकर

🏏 सध्या आयपीएलच्या 13व्या हंगामात सगळेच सामने रोमांचक होत आहेत. याआधी बँगलोरचा संघ आयपीएलच्या बहुतेक हंगामात उपांत्य, उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता. यावेळीही युवा खेळाडूंची मेहनत फळास उतरलेली चांगलीच दिसत आहे.

🧢 दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला सहज पराभूत केलं. श्रेयस अय्यर कॅप्टन असलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं 6 विकेटनं हा सामना जिंकला आणि प्लेऑफमध्ये जागाही मिळवली. दिल्लीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर, बॅंगलोरनं सामना गमवूनदेखील प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.

Advertisement

😎 ‘या’ खेळाडुमुळे बॅंगलोर प्लेऑफमध्ये-

▪️ RCBने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीविरुद्ध 7 बाद 152 धावा केल्या. बॅंगलोरकडून सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलनं 41 चेंडूत 50 धावा केल्या. देवदत्तच्या या धडाकेबाज खेळीमुळे बॅंगलोरने प्लेऑफमध्ये सामना गमवूनही धडक मारली. आयपीएलमधले देवदत्तचे हे पाचवे अर्धशतक होते.

Advertisement

▪️ आयपीएलमध्ये अशी मजबूत कामगिरी करणारा देवदत्त पहिला अनकॅप्ड (एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला) खेळाडू ठरला आहे. देवदत्तच्या या अर्धशतकी खेळीमुळे कर्णधार विराट कोहलीच्या संघाला प्लेऑफ गाठता आले.

🤝 अशी लागली ‘देवदत्त’ची वर्णी-

Advertisement

🔰 बॅंगलोर संघात देवदत्त 2019मध्येही होता. पण त्यावेळी त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देवदत्तनं जबरदस्त कामगिरी केलीच होती, मग या फलंदाजाला विराटनं संधीचं सोनं करण्यासाठी निवड केली.

🔰 यंदाच्या हंगामात बॅंगलोरकडून सर्वात जास्त धावांचा पाऊस पडणारा फलंदाज देवदत्त ठरला आहे. त्यानं 14 मॅचमध्ये 33.72 च्या सरासरीनं 472 धावा केल्या आहेत. या हंगामात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्या पुढे केएल राहुल (670) आणि शिखर धवन (525) असे दोन सिनियर फलंदाज आहेत आणि या यादीत देवदत्त तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement