SpreadIt News | Digital Newspaper

सहकलाकाराची शिवीगाळ; म्हणून या नायिकेने मालिका सोडली.!

0

🎭 ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मालिका सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत असतानाच निर्मात्या अलका कुबल यांनीही अनेक खुलासे केले आहेत. आता त्यावर प्राजक्ताने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं आहे.

🧐 ‘हे’ आहे प्राजक्ताचं मालिका सोडण्याचं कारण-

Advertisement

◼️ शिवीगाळ झाल्यानेच मी मालिका सोडली असं प्राजक्ता म्हणाली. ‘आई माझी काळूबाई’ ही मालिकेतील आर्या फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या मालिका सोडण्याच्या बातमीमुळे चर्चा होत आहे. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप ही भूमिका साकारणार आहे.

◼️ प्राजक्ताने अचानक ही मालिका सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत असतानाच या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनीही प्राजक्ताबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. आता त्यावर प्राजक्ताने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘काळूबाई’च्या सेटवर आपल्याला शिवीगाळ झाल्यानेच आपण ही मालिका सोडली असं तिने सांगितलं आहे.

Advertisement

👩‍🦰 ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका सोडण्याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली, “ही मालिका मी सोडली आहे. अनेक ठिकाणी या मालिकेतून मला काढल्याची, मी ती एका दिवसात सोडल्याचाही चुकीची चर्चा होतेय. मी मालिका सोडणार हे निर्मात्या अलका कुबल यांना 6 दिवस आधीच सांगितलं होतं. 31 ऑक्टोबरला माझा चित्रिकरणाचा शेवटचा दिवस असेल, असं मी कळवलं होतं. यासोबतच एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरलाही माहिती होतं. मी ठरल्यानुसार मालिका सोडली आहे. शिवाय, मला माझ्या सहकलाकाराकडून शिवीगाळ झाल्यानेच ही मालिका मी सोडली आहे.

👁‍🗨 ‘असा’ आहे संपूर्ण घटनाक्रम-

Advertisement

🔰 शिवीगाळ कुणी आणि कधी केली याबद्दल प्राजक्ताने विवेक सांगळे या कलाकाराचं नाव घेतलं आहे. ती म्हणाली, ‘आशालता वाबगावकर यांचं निधन झाल्यावर मुंबईत फिल्मसिटीत मुख्य कलाकारांना घेऊन या मालिकेचं चित्रीकरण सुरू करायचं ठरलं होतं. त्यामुळे एका गाडीतून मी, माझी आई, विवेक आणि ड्रायव्हर जाणार होतो. त्यावेळी बोलताना विवेकने, “आपण अनेक कोरोना पेशंट्सना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं.”

🔰 साहजिकच, विवेकसोबत प्रवास करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सेटवरही आधीच एका वयस्कर कलाकाराचा मृत्यू ओढवला होता. त्यामुळे मी त्या गाडीतून येण्यास नाही म्हटले. त्यानंतर विवेक मला गलिच्छ भाषेत बोलायला लागला आणि शिवीगाळही सुरू केली. एवढं होऊनही मालिका सुरूच राहावी म्हणून मी चित्रीकरण सुरु केलं. पण सहकलाकार म्हणून त्याच्यासोबतचे सीन करताना माझ्यासोबत त्याने केलेली शिवीगाळ मला सतावू लागली आणि मग मी मालिका सोडायचा निर्णय घेतला. याविषयी सर्वकाही माहिती आणि तारीख मी निर्मात्यांना कळवली होती.”

Advertisement

🤬 विवेकने शिवीगाळ केल्याबद्दल अलका कुबल म्हणतात, “विवेक एक चांगला मुलगा आहे. त्याने अनेक कोरोना रुग्णांना खूप मदत केली आहे. प्राजक्ता व तिच्या आईसोबत असताना तो फोनवर एका माणसाला संतापाच्या भरात हे सगळं सुनावत होता. ‘तशी त्याने शिवीगाळ आमच्यासमोर करायला नको होती’, असं प्राजक्ताचं म्हणणं होतं. आता प्राजक्ता हा मुद्दा बदलवून ‘विवेक आपल्यालाच शिव्या देत होता’, असं म्हणू लागली आहे.” त्याचवेळी प्राजक्ता हे सगळं नाकबूल करते. मुंबईला त्या गाडीतून जायला नकार दिल्यानंतर विवेकने आपला अपमान करत शिवीगाळ केली असं ती म्हणाली.

Advertisement