SpreadIt News | Digital Newspaper

💰 34 हजार 850 कोटींचे सामंजस्य करार; मुख्यमंत्री म्हणाले,” ही तर फक्त सुरुवात आहे..”

0

✊ महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात 1 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी आणि विविध कंपन्यांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत.

Advertisement

🤨 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले..

▪️राज्यात यावेळी 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. तसेच यामुळे सुमारे 23 हजार 182 लोकांना रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी करण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

▪️ मुख्यमंत्री म्हणाले, “गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगधंद्यांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारखी कामे झाली आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.”

▪️ कोरोनासारख्या भयाण संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान आहे.

Advertisement

💁🏻‍♂️ राज्यात 1,00,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकीचे लक्ष्य-

▪️ ‘स्वाक्षऱ्या झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे, सोबतच आपल्या राज्यात सुमारे 35,000 कोटींची गुंतवणूक होत आहे ही महत्वाची बाब आहे,असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं आहे.

Advertisement

▪️ ‘लवकरच 1 लाख कोटींपेक्षा मोठी गुंतवणूक राज्यात आणण्याचे प्रयत्न आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात उच्चस्थानी पोहीचेल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

🗣️ उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, “महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी युके, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी सामंजस्य करार केले आहेत, तरी आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. विविध क्षेत्रातील बड्या गुंतवणूकदारांना पोषक वातावरण राज्यात उपलब्ध आहे.”

Advertisement

🏭 राज्यात ‘या’ क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उद्योजक उत्सुक- युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे झालेले करार आहेत. केमिकल, डेटासोबतच लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement