SpreadIt News | Digital Newspaper

सचिन तेंडुलकर एक नाव नसून ब्रँड आहे, आजही जाहिरातीतून कमवतो इतके कोटी रुपये

0

💰 सचिन तेंडूलकर रिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही आधीइतकाच प्रसिद्ध आहे. तो वेगवेगळ्या 18 ब्रँडसच्या माध्यामातून मोठी कमाई करत आहे. सचिन वेगवेगळ्या जाहिराती आणि कामांमध्ये आधीपेक्षा जास्त व्यस्त आहे. जाणून घेऊ सचिनची एवढी भरभराट कशी झाली..

🤘 असा घडला ‘सचिन’ नावाचा ब्रँड

Advertisement

▪️ Duff & Phelps च्या 2019 च्या लिस्टमध्ये सचिन हा एकमेव रिटायर्ड सेलिब्रिटी होता. 2019 मध्ये तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू 15.8 टक्क्यांनी वाढून 25.1 मिलियन डॉलर (185 कोटी रुपये) पर्यंत वाढली आहे. Livpure आणि Luminous, डीबीएस बँक, जिलेट, BMW आणि UNICEF अशा एकूण 18 ब्रँडससह सचिन काम करत आहे.

▪️ सचिनने 2016 मध्ये आपली पत्नी अंजली तेंडुलकर हिच्यासमवेत स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी SRTSM सुरु केली. क्रिकेट कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला 6-7 कोटी रुपये ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटमधून मिळत असे. सध्या ते 4 ते 5 कोटींवर आलेले आहे.

Advertisement

▪️ बिझनेसमॅन म्हणून त्यांनी ‘Sachin Saga’ नावाचा एक ऑनलाइन गेम तयार केला आहे. आतापर्यंत सुमारे 1.5 मिलियन गेमर्स त्यावर खेळतात. त्यांनी 100MB नावाचे एक प्लॅटफॉर्म देखील डिझाइन केले आहे, जिथे अनेक स्वरूपात सामग्री उपलब्ध आहे.

▪️ मुंबई टी -20 लीगशी त्याची दीर्घकाळ भागीदारी आहे. याशिवाय त्याने Middlesex Cricket आणि County Club बरोबर देखील भागीदारी करून Tendulkar Middlesex Global Academy स्थापन केली आहे.

Advertisement

👥 सचिनचे सोशल मिडीयावर फॉलोअर्स

♨️ फेसबुक – 2.8 कोटी

Advertisement

♨️ ट्विटर – 3.43 कोटी

♨️ इंस्टाग्राम – 2.71 कोटी

Advertisement