😳 देशभरामध्ये कोरोनाचा फैलाव झालेला असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं केवळ 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत.
💁🏻♂️ कंपनीच्या दिलेल्या माहितीनुसार..
▪️ कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे 241 कोटी कमवले आहेत.
▪️ 23 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान एकूण 23 लाख 54 हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे.
▪️ ऑनलाईन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या औषधाची किंमत 545 रुपये तर ऑर्डर केल्यानंतर अवघ्या 2 तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल, असा दावा कंपनीने केला होता.
📍 रामदेव बाबा आणि पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी 23 जूनला या औषधाची घोषणा केली होती. तरी हे औषध कोरोनावर खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.