SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रातोरात फेमस झालेल्या ‘बाबा का ढाबा’च्या मालकांकडून युट्युबर ‘गौरव वासन’विरोधात पोलिसात तक्रार

सोशल मीडियावर कोण कधी फेमस होईल माहित नाही! असाच दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ रातोरात फेमस झाला होता. युट्युबर गौरव वासनने पोस्ट केलेल्या व्हिडीओ मुळे हा ढाबा फेमस झाला आणि ढाब्याचे मालक कांता प्रसाद याना मदतीचा ओघ सुरु झाला.

परंतु, ज्या युट्युबरच्या व्हायरल व्हिडीओमुळे ‘बाबा का ढाबा’ फेमस झाला त्याच युट्युबरवर म्हणजेच गौरव वासनवर ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलीय.

Advertisement

या तक्रारीनुसार, लोकांनी कांता प्रसाद यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत केली होती, ज्यामध्ये अफरातफर झाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने लोक समोर आले होते. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मदतीसाठी जे पैसे जमा झाले होते, त्यात गौरव वासनने अफरातफर केली आहे, असा कांता प्रसाद यांचा आरोप आहे.

यू ट्यूबर गौरव वासनवर हे आहेत आरोप

Advertisement

गौरव वासन यू ट्यूबर आहे ज्याच्या चॅनेलवर ऑक्टोबर मध्ये ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बादामी देवी रडत आपलं दु:ख सांगताना दिसत होते.

जगभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचं उत्पन्न 100 रुपयांपेक्षा कमी होतं, असं कांता प्रसाद या व्हिडीओमध्ये सांगतात. त्यांची ही व्यथा यू-ट्यूबर गौरव वासनने कॅमेऱ्यात कैद करुन आपल्या चॅनलवर अपलोड केला होता आणि या वृद्ध दाम्पत्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

Advertisement

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबा का ढाबामध्ये एकच गर्दी झाली होती. दाम्पत्याला पैसे ट्रान्सफर करुन मदत करण्याची व्यवस्थाही झाली. परंतु गौरव वासनने यातच अफरातफर केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला. त्यांच्या माहितीनुसार, गौरवने जाणीवपूर्वक केवळ त्याचा आणि कुटुंबियांच्या बँक खात्याची माहिती शेअर करुन मोठी रक्कम जमा केली. तसंच गौरवने त्यांना कोणत्याही व्यवहाराची माहिती दिली नाही.

गौरव वासनने फेटाळले आरोप

Advertisement

परंतु दुसरीकडे गौरव वासनने सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्व रक्कम कांता प्रसाद यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केला होता, असा त्याने सांगितलं. मी जेव्हा हा व्हिडीओ बनवला होता, तेव्हा मला माहित नव्हतं की या व्हिडीओचा एवढा मोठा परिणाम होईल.

बाबांना त्रास होऊ नये यासाठी मी माझ्या बँक खात्याची माहिती दिली, असंही तो म्हणाला. वासनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो बँक खात्याची माहिती दाखवताना दिसत आहे. त्याने फेसबुक पेजवर बँक स्टेटमेंट अपलोड करण्याचा दावा केला आहे.

Advertisement

तर पोलीस करणार कारवाई
आम्हाला तक्रार मिळाली असून तपास सुरु आहे, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी दिली आहे. कांता प्रसाद यांना आर्थिक मदत करण्याच्या प्रकरणात कोणी अफरातफ केल्याचं समोर आलं तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Advertisement