SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गिलगिट-बाल्टिस्तान आमचा अविभाज्य घटक; भारताने दिला पाकला इशारा!

🙅🏻‍♂️ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका निर्णयाला भारताने कडाडून विरोध दर्शविला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानने प्रांताचा दर्जा दिल्यामुळे भारताने या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.

🗣️ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले..

Advertisement

▪️’पाकिस्तानने बेकायदेशीर आणि जबरदस्तीने भारताच्या भूभागावर अतिक्रिमण केलं आहे’, हे भारत कधीच स्वीकारणार नाही.

▪️ जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले आहे.

Advertisement

▪️ गिलगिट-बाल्टिस्तान यांना घटनात्मक हक्क देण्यात येतील, असा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये येथे निवडणुका होणार आहेत.

🙌 पाकिस्तानातूनही मिळतोय पाठिंबा-

Advertisement

📌 पाकिस्तानच्या या कृत्याचा भारतासोबतच पाकिस्तानमधूनही विरोध केला जात आहे. विरोधी पक्षांनीही पाकिस्तानच्या इम्रान सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.

📌 इम्रानच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेश करण्याचा भारताचा निर्णय वैध असल्याचे सिद्धांत पाकिस्तानमध्ये मांडले जात आहे.

Advertisement

📌 निवडणुकांनंतर पाकिस्तान सरकारने याप्रकरणी विरोधकांना आश्वासन दिले होते, परंतु इम्रानने यापूर्वीच घोषणा केली आहे.

Advertisement