SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पॉझिटिव्ह न्यूज : डिसेंबरपर्यंत भारताला कोरोना लस उपलब्ध होऊ शकेल; पुनावाला यांची माहिती

🔰 रशियात एक नाही तर दोन लशी आल्या पण भारतात लस कधी उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता पुण्यात सर्वात मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे

📍 सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले आहेत की ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका परीक्षेच्या निकालाच्या आधारावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविड -19 लशीसाठी आणीबाणी परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहे.

Advertisement

🔎 डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस येईल मात्र त्यासाठी इमरजन्सी ही लस वापरण्यासाठी परवाना मिळणं आवश्यक आहे. जर ही परवानगी मिळाली नाही तर कोरोनाची लस जानेवारीपर्यंत भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते

👌 ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्सिस्टीट्यूटनं तयार केलेल्या याा लशीची चाचणी ब्रिटनमध्ये देखील सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही लस डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकेल असंही पूनावाला यांनी सांगितलं

Advertisement

🔶 भारतात सध्या 5,94,386 रुग्णांवर उपचार सुरू असून 57,386 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात 73,73,375 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Advertisement