SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 1 ते शनिवार 7 नोव्हेंबर 2020

▪️ मेष – यशासाठी संघर्ष करावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा डावलला जाऊ शकतो. नोकरीत एक पाऊल मागेच रहा. कुटुंबात वरिष्ठांचा मान ठेवा. शिक्षणात अडचणी येतील, पण चिकाटी सोडू नका.

▪️ वृषभ – कामे रेंगाळत ठेवू नका. नवीन परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात आळस दूर ठेवा. प्रगतीचा मार्ग मिळेल. वेळेला महत्त्व द्या.

Advertisement

▪️ मिथुन – व्यवसायात जम बसेल. नोकरीत वर्चस्व सिद्ध कराल. समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल. किचकट प्रश्न मार्गी लावाल. आलेल्या संधीचा योग्य वापर करा.

▪️ कर्क – व्यवसायात सुधारणा होईल. नवे काम मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे काम करून दाखवाल. तुमच्या क्षेत्रात नवीन परिचयाचा उपयोग करून घेता येईल.

Advertisement

▪️ सिंह – कार्याला गती मिळेल. क्षुल्लक तणाव होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात रेंगाळत राहिलेला प्रश्न मार्गी लावाल. नोकरी, व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबातील तणाव कमी होतील. कलासाहित्यात प्रगती होईल.

▪️ कन्या – शिक्षणात दुर्लक्ष नको. व्यवसायात कोणालाही दुखवू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मैत्री करताना सावध रहा. कुटुंबात जबाबदारी वाढेल. वाटाघाटीत गैरसमज होतील.

Advertisement

▪️ तूळ – गुंतवणूक करताना सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना पुढे नेता येईल. प्रसिद्धी लाभेल, अधिकार प्राप्ती होईल. कला, साहित्याला चालना मिळेल.

▪️ वृश्चिक – वक्तव्य करताना सावध रहा. गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

Advertisement

▪️ धनु – किरकोळ वादाला जास्त महत्त्व देऊ नका. तुमच्या क्षेत्रात प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची थोडी पीछेहाट झाली असली तरी आता संधी मिळेल. दिनांक -13, 17ला शेअर्समध्ये फायदा होईल.

▪️ मकर – खर्चावर आळा घाला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समोरच्या पक्षावर तुमचा दबाव राहील. विरोधकांना शह देणं थोडं जड जाईल. व्यवसायात तडजोड करावी लागेल. खर्चावर आळा घाला. कला, साहित्यात चमकाल.

Advertisement

▪️ कुंभ – समस्या सोडवताना तारेवरची कसरत होईल. मनोबल राखा. नोकरीत व्याप सांभाळावे लागतील. कुटुंबात क्षुल्लक वाद होतील. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात अडचणींतून मार्ग काढा.

▪️ मीन – या आठवडय़ात महत्त्वाची कामे करा. व्यवसायातील वाद टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून मत व्यक्त करा. कामे रेंगाळत ठेवू नका. कला, साहित्य क्षेत्रात संमिश्र अनुभव येतील.

Advertisement