SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सर्च इंजिनची तयारी: आयफोनमध्ये गुगलऐवजी ॲपलचे सर्च रिझल्ट?

📱 तंत्रज्ञानात अव्वल असलेल्या गुगलला आव्हान देण्यासाठी ॲपलने आता पाऊल उचलले आहे. कंपनीने अशातच आयफोनच्या नवीन मॉडेलमध्ये आयओएस 14 च्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बदल केले आहेत.

🧐 फायनान्शियल टाइम्सनुसार..

Advertisement

📳 आयओएस 14 मधील काही सर्च फंक्शनमध्ये गुगलचा समावेश नाही. आयफोनच्या होम स्क्रीनवर उजव्या बाजूला स्वाइप केल्यानंतर उघडणाऱ्या विंडोमध्ये सर्च केल्यास गुगल रिझल्टऐवजी ॲपल जनरेटेड लिस्ट दाखवली जात आहे.

📳 वास्तविक, आपले अंतर्गत प्रकल्प गोपनीय ठेवण्यात ॲपल कुख्यात आहे. मात्र, हे नवे पाऊल पाहता स्पष्ट होत आहे की ॲपल आता गुगल सर्च इंजिनचा प्रतिस्पर्धी होऊ पाहत आहे.

Advertisement

📳 अडीच वर्षांपूर्वी ॲपलने गुगल सर्चचे प्रमुख जॉन गियान्नांड्रिया यांना आपल्या ताफ्यात घेतले होते. गियान्नांड्रियांकडे गुगल सर्च इंजिन 8 वर्षे चालवण्याचा अनुभवही होता.

📍 चुकीचा मॅप तयार केल्याने गेली हाेती नाेकरी- 2012 मध्ये गुगलशी स्पर्धेच्या नादात ॲपलला बराच फटका बसला हाेता. तेव्हा ॲपल मॅपमध्ये इतक्या चुका हाेत्या की, उच्चाधिकारी स्काॅट फाेरस्टाल यांना स्टीव्ह जाॅब्ज यांच्यासमाेर राजीनामा द्यावा लागला हाेता. मात्र, आता ॲपलकडे इंडेक्स वेब तयार करण्याइतपत संसाधने उपलब्ध आहेत.

Advertisement