SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ भन्नाट कार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लाँच होणार!

💁🏻‍♂️ फेस्टिवल सीजन दरम्यान अनेक कार निर्माता ब्रँड्स अनेक मॉडल्स भारतात लाँच केले आहेत. तर अनेक मॉडल्स दिवाळीपर्यंत भारतात लाँच करणार आहेत. तसेच या कारची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

🚙 नवीन ह्युंदाई i20- कंपनीने या कारसाठी भारतात बुकिंग सुरू केली आहे. कंपनी 5 नोव्हेंबर रोजी या कारला भारतात लाँच करणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आणि टॉप मॉडलची किंमत 11 लाख रुपयांपर्यंत आहे.

Advertisement

🚙 रेनॉ एचबीसी (Kiger)- रेनॉ या कारद्वारे भारतीय बाजारात पहिल्यांदा सब 4 मीटर एसयूव्ही लाँच करणार आहे. या कारमध्ये 1 लीटरचे 3 सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. या कारची किंमत 6.5 लाख रुपये ते 9 लाख रुपये या दरम्यान असू शकते.

🚙 टाटा एचबीएक्स- या कारद्वारे टाटा मायक्रो एसयूव्ही सेगमेंट मध्ये पाऊल ठेवणार आहे. कारला कंपनीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आणले होते. या छोट्या एसयूव्ही मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. कारची किंमत 5 लाख रुपये ते 7 लाख रुपयांवरदरम्यान असू शकते.

Advertisement