👉 दररोजच्या गोष्टींचे नियमात उद्यापासून देशभरात बदल होणार आहे. त्यातील असे काही बदल आहेत, ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे
⭕ एलपीजी सिलिंडरच्या वितरण: आता ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर गॅस वितरणापूर्वी ओटीपी पाठविला जाईल. सिलिंडर जेव्हा आपल्या घरी येईल तेव्हा डिलिव्हरी बॉयबरोबर ओटीपी शेअर करावा लागेल. ओटीपी सिस्टम जेव्हा एकमेकांशी जुळेल तेव्हाच भेटणार सिलिंडर
◼️इंडेन गॅसच्या ग्राहकांना आता एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी 7718955555 वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.
◼️दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती राज्यातील तेल कंपन्यांकडून ठरवल्या जातील. किंमती वाढू शकतात किंवा दिलासादेखील मिळू शकतो.
💸 एसबीआयचे काही महत्त्वपूर्ण नियम: एसबीआय बचत खात्यांवर कमी व्याज मिळेल. आता बचत खात्यावर 1 नोव्हेंबरपासून 1 लाख रुपयांपर्यंत 0.25 टक्के व्याजदर कमी करून 3.25 टक्के केले जाईल. तर 1 लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल
🚊 भारतीय रेल्वे: भारतीय रेल्वे 1 नोव्हेंबरपासून देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे