⚡ राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत.
🛄 हि भारतिरक्रिया लवकरच सुरु होणार असून यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांमधून समाधान व्यक्त होत आहे.
📣 अशी होणार भरती :
▪️ सदरील भरतीप्रक्रियेमध्ये तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती होणार असून तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या अशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत.
▪️ या भरतीप्रक्रियेमुळे आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार असून अभियांत्रिकी पदवीधारकांनाही याचा लाभ होणार आहे.
📌 दरम्यान, यासाठीचा प्रस्ताव मंत्री डॉ. राऊत यांच्या निर्देशांनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी तयार करून सादर केला आहे. भरतीप्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेशही मंत्री राऊत यांनी दिले आहेत.