SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रेरणादायी: वाचा ‘मिर्झापूर’मधील पंकज त्रिपाठींच्या संघर्षाबद्दल..

1️⃣ शेती करत असलेल्या पंकज यांना खरंतर डॉक्टर व्हायचे होते. पण दोन वेळा मेडिकल प्रवेश परिक्षेत नापास झाल्यावर त्यांनी डॉक्टर होण्याचा स्वप्न सोडून ते अभिनयाकडे वळले.

2️⃣ पंकज त्रिपाठी यांनी जेलची हवा देखील खाल्ली आहे. कॉलेजला असताना विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना 7 दिवस कारावासात राहावे लागले होते.

Advertisement

3️⃣ पंकज त्रिपाठी यांचा प्रेमविवाह झाला आहे. 1993 ते 2004 असे तब्बल 11 वर्षं हे प्रेम-प्रकरण चालले आणि शेवटी दोघांनी लग्नाची गाठ बांधली. या काळात ते स्वयंपाकी म्हणून काम करत होते.

4️⃣ पंकज यांची प्रेयसी कोलकात्यात, तर ते पाटणाला राहत असत. ते मग कोलकाताहुन चप्पल, बूट आणून पाटण्यात विकू लागले. अशा प्रकारे प्रेयसीची भेट देखील होत असे आणि त्यांना दोन पैसे देखील मिळत असत.

Advertisement

5️⃣ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय शिकल्यावर त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले होते. यामुळे आपल्या अभिनयाला धार आली असे त्यांचे मत आहे. ‘विद्यार्थ्यांनी देखील 12वी झाली की एकदा भारत भ्रमण करावे’, असा सल्ला ते देतात.

6️⃣ स्ट्रगलिंगच्या दिवसात एकदा पंकज त्रिपाठी यांची राम गोपाल वर्मा यांनी ऑडीशन घेतले. चार्ल्स शोभराजच्या गेटअपसाठी 3,500 रुपये खर्च करून पंकजने भूमिकेसाठीचे कपडे घेतले. पण तरी काम मिळाले नाही.

Advertisement

7️⃣ पंकज सिनेमांमध्ये काम मिळविण्यासाठी धडपड करत असताना त्यांचे घर बायको मृदुला चालवत होती. मृदुला एका शाळेत शिकवून घरातील सर्व खर्च करत असे तर पंकज सातत्याने ऑडीशन देत असत.

8️⃣ आज प्रचंड यशस्वी दिसत असलेल्या पंकज यांनी सुरुवातीला अनेक सिरीयल आणि जाहिराती केल्या आहेत. पहिल्यांदा विकत घेतलेली स्प्लेंडर गाडी ते रात्रभर बघत बसत.

Advertisement

9️⃣ पंकज यांचा पहिला सिनेमा म्हणजे रन. त्यांचा फक्त एक सीन होता. या प्रसंगात ते ‘बिर्याणी खाणाऱ्या विजय राजला ती चिकन बिर्याणी नसून कौव्वा बिर्याणी आहे’, असे सांगतात.

🔟 लक्ष सिनेमावेळी त्यांना एक रोल देण्यात आला होता. खुश झालेल्या पंकज यांनी ही बातमी स्थानिक पेपरमध्ये देखील दिली. पण पूर्ण सिनेमात ते कुठेच दिसले नाहीत. त्यांचे पूर्ण पात्र सिनेमातून कट करण्यात आले होते. नेहमीच पंकज यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज उच्च शिखर गाठलं आहे.

Advertisement