👏 दोन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आलेल्या मोदींनी आज नर्मदा जिल्ह्यात भव्य आरोग्य वनचे उद्घाटन केले आहे
🧐 हे वन लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी जवळ आहे. 17 एअर भागावर औषधी रोपांची यामध्ये लागवड करण्यात आली आहे
✈️ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच औषधी वनस्पतींची ओळख त्याचे फायदे या वनात पहायला मिळणार आहेत.
🧘♀️ योगा, ध्यान, आयुर्वेद यांचा आरोग्याला कसा फायदा होतो याच महत्त्व पटवून देत जनजागृतीचं काम देखील आरोग्य वन मध्ये होणार आहे.
आरोग्य वनमध्ये नेमकं खास काय ❓
▪️ योगसाधनेचे महत्त्व पटवण्यासाठी आरोग्य वनच्या प्रवेशद्वारावरच सूर्य नमस्कारातील 12 स्थितींचा समावेश असलेल्या मानवी आकृती आहेत.
▪️ मानवावर वनऔषधींचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती देणारी डिजिटल इंफॉर्मेशन येथे आहे.
▪️ कोणत्या अवयवासाठी कोणती वनौषधी आवश्यक आहे, तिचा वापर कसा होणार याची माहिती देणारी आणी वनातील महत्त्वाचं आकर्षण असणारी मानवाकृती येथे आहे.