SpreadIt News | Digital Newspaper

ना हॉस्पिटल..ना ऑक्सिजन..मोबाइलमधील केवळ या एका गोष्टीमुळे 100 कोरोना रुग्ण ठणठणीत!

0

👨🏻‍⚕ 100 कोरोना संक्रमित रुग्णांवर गुना जिल्ह्यातील 9 डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपचार केले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत या डॉक्टरांनी निरीक्षण व टिप्स देत कोरोना रुग्णांना बरं केलं आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यात घरात राहून 107 पैकी 100 कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुनाच्या या डॉक्टरांनी भोपाळमधील होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांवर उपचार केले आहे.

🤕 जिल्ह्यात आतापर्यंत 925 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यापैकी 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 2 महिन्यात 107 कोरोना संसर्ग झालेले व होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू होते.

Advertisement

📱 त्यांनी दिवसातून दोन वेळा औषधांचा डोस दिला जात होता व व्हिडीओकॉलवर त्यांच्यावर उपचार केला जात होता. ज्यामुळे 100 रुग्णांची तब्येत बरी झाली असून ते कामात रुजू झाले आहेत. अनेकांनी या डॉक्टरांचं आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.

Advertisement