डिस्नेचं साम्राज्य उभं करणाऱ्या वॉल्ट डिस्नेची प्रत्येकाने वाचावी अशी प्रेरणादायी गोष्ट; अशी झाली ‘मिकी माऊस’ची सुरुवात
🧐 प्रत्येकाचा एक काळ असतो. विशेषकरून कलाकारांना आणि व्यावसायिकांना समाजाशी, कुटुंबाशी मोठा संघर्ष करत स्वतःला सिद्ध करावं लागतं. आजच्या घडीला कला- माध्यमक्षेत्रातील स्वतःचं मोठं साम्राज्य असणारी कंपनीचा मालक वॉल्ट डिस्नेची खडतर आयुष्य जगत होता.
😳 तारुण्यात म्हणजेच ऐन उमेदीच्या काळात त्याला सगळीकडून नकार येत होते. त्या काळी फार कष्टाने वॉल्ट डिस्ने वेळ मन आणि कष्ट लावून विविध व्यंगचित्र साकारायचा. मात्र वॉल्ट डिस्नेजवळ प्रतिभा, सर्जनशीलता नाही, असे त्या कालचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणायचे. तसेच ते त्याचे चिञं साभार परत करायचे.
😲 त्याला वाटलं आपले आयुष्य असेच जाईल की काय? अनेक प्रश्न समोर होते. आता त्याने वृत्तपत्रांचा नाद सोडून दिला. मिळेल ते काम करायचं म्हणून तो कामाच्या शोधात बाहेर पडला. दिवस असेच चालले असताना एक दिवस चर्चमधील एका धर्मोपदेशकाने काही व्यंगचिञ काढण्यासाठी त्याला बोलावलं. अत्यंत कमी पैशात डिस्ने चित्र काढायला तयार झाला. त्यावेळी त्याला अतिशय खराब अशी रूम काम करण्यासाठी दिली. तिथे उंदरांचा सुळसुळाट होता.
💥 डिस्नेला वाटलं, झक मारली आणि इथं आलो. त्याचा काम करण्याचा फार मूड नव्हता. अशा कोंदट आणि खराब खोलीत त्यालाच काय कुठल्याच कलाकाराला काही सुचलं नसतं इतकी खराब खोली होती. डिस्ने आपला बसल्या बसल्या उंदरांची गंमत पाहू लागला. तेथील एक छोटा उंदीर खेळताना पाहून त्याला उंदरावर आधारित चिञमालिका तयार करण्याची प्रेरणा मिळाली.
🤩 या चित्रमालीकेने काय इतिहास घडवला आहे, हे आपण सगळेच जाणतो. हीच मालिका आज जगभर आबालवृद्धांना आवडणाऱ्या “मिकी माऊस” ची सुरुवात होती. आज डिस्नेने करोडो रुपयांचं साम्राज्य कला-माध्यम क्षेत्रात उभारलं आहे. यशस्वी लोक हे काही अवाढव्य ,अचाट करीत नाहीत; तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व्यवस्थित करतात.