Take a fresh look at your lifestyle.

जेम्स बाँड’ काळाच्या पडद्याआड: सर शॉन कॉनेरी यांचे निधन!

0

😔 जगभरातील सिनेरसिकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत ‘जेम्स बाँड’ची भूमिका अजरामर करणारे सर शॉन कॉनेरी यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कॉनेरी यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला. कॉनेरी यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

▪️ शॉन कॉनेरी यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण जेम्स बाँड म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरले गेले. त्यांचा अभिनय कायमचं प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल.

Advertisement

🎖️ त्यांच्या सिनेकारकीर्दीत त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर तीन गोल्डन ग्लोब आणि दोन बाफ्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Advertisement

Leave a Reply