SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एन ९५’ मास्क आता १९ ते ४९ रुपयांना; सरकारचे दरावर निर्बंध

📌 मास्कची किंमत निश्‍चित करून नागरिकांना ते माफक दरात मिळावेत म्हणून पुढाकार घेणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता ‘एन ९५’ मास्क १९ ते ४९ रुपयांना मिळणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

▪️ विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्रीमूल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करीत आहे.

Advertisement

▪️ मास्कच्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात म्हणून घेण्यात आलेल्या पुढाकाराला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे टोपे यांनी सांगितले.

Advertisement