SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता फेसबुक ‘अशा’ प्रकारे देणार Google-Amazon ला टक्कर; फुकट देणार ‘ही’ सर्विस

▪️ जगभरात आता काही ठराविक ॲपमध्येच स्पर्धा सुरु आहेत. एकाचवेळी वेगवेगळे व्यवसाय करणारे या ॲप्समध्ये सेवा पुरवण्यावरून स्पर्धा चालू झाली आहे.

▪️ सध्या युजर्स मोठ्या प्रमाणात थेट ॲपवर जाऊन गूगलचे स्टाडिया किंवा ॲमेझॉनचे लूनासारखे ॲप वापरतात. मात्र आता फेसबुकने मोठी शक्कल लढवली आहे. फेसबुक आता थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेम्स आणण्यासाठी सज्ज झाली आहे.

Advertisement

▪️ सुरुवातीला क्लाऊड सर्व्हिसवरील गेम हे युजर्सना फ्री खेळता येणार आहेत. त्याकरता कंट्रोलर सारखं कुठलंही हार्डवेअर विकत घेण्याची गरज त्यांना भासणार नाही. हे गेम्स फेसबुकच्या गेम टॅबमध्ये उपलब्ध होणार आहेत.‌ तसंच HTML5 इन्स्टंट गेम्स हे सुद्धा सध्या युजर्ससाठी उपलब्ध असतील, अशी माहिती फेसबुकचे उपाध्यक्ष जेसन रुबिन यांनी दिली.

▪️ सध्या तरी फेसबुकने काही ठराविक युजर्सला बीटा व्हर्जन ऑफ मल्टिपल टायटल्स उपलब्ध करून दिले आहेत. हे वापरकर्ते अमेरिकेतील आहेत. मिळालेल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबूक क्लाऊड गेमिंग हे सध्या ॲपलने घातलेल्या बंधनांमुळे iOS डिव्हाइसवर वापरता येणार नाही.

Advertisement

▪️ लवकरच फेसबुक आणखी काही गेम उपलब्ध करून देणार आहे. जेव्हा युजर फेसबुक क्लाऊड गेम वरून Asphalt 9 वर स्विच करतील तेव्हा फेसबुक Log in द्वारे त्यांचा सर्व डेटा त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल, अशी माहिती पुढे रुबिन यांनी सांगितली.

Advertisement