Take a fresh look at your lifestyle.

अर्थव्यवस्था येतेय रुळावर; तब्बल 8 महिन्यांनंतर 1 लाख कोटींहून अधिक जीएसटी वसूल

0

▪️ 2020 वर्षात फेब्रुवारीनंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त जीएसटी जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे. जमा झालेल्या जीएसटीपैकी 19,193 कोटी रुपये सीजीएसटी (CGST), 25,411 कोटी एसजीएसटी (SGST) आणि 52,540 कोटी आयजीएसटीचे (IGST) आहे.

▪️ आयजीएसटीमध्ये मालाच्या आयातीतून 23,375 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर 8,011 कोटी रुपये उपकर म्हणून जमा झाले असून त्यापैकी 932 कोटी रुपये आयात केलेल्या वस्तूंवर (Imported Goods) आकारण्यात आलेल्या उपकरातून जमा झाले आहेत.

Advertisement

▪️ मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी महसूल (GST Revenue) 10 टक्क्यांनी वाढला आहे. आयातीच्या माध्यमातून मिळलेला महसूल ऑक्टोबरमध्ये 9 टक्क्यांनी अधिक झाला आहे.

Advertisement

Leave a Reply