SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंबानींच्या सुरक्षेवरुन सुप्रीम कोर्ट म्हणाले..”पैसेवाले खर्च उचलू शकतात, राज्यांनी सामान्यांची काळजी घ्यावी”

👮🏻 सर्वोच्च न्यायालयाने मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी बंधूंची झेड प्लस सुरक्षा मागे घेण्याची याचिका फेटाळली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या मताचे समर्थनही केले आहे.

⚖️ उच्च न्यायालय म्हणाले होते की..

Advertisement

▪️ ज्यांच्या जीवितास धोका आहे आणि जे सुरक्षेचा खर्च देण्यास तयार आहे, अशांना उच्चस्तरीय सुरक्षा दिली पाहिजे.

▪️ कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यांची असते. यामध्ये ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचाही समावेश आहे.

Advertisement

▪️ रिलायन्स इंडस्ट्रीज लि.च्या महसूलाचा भारताच्या जीडीपीवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या लोकांच्या जीविताला असलेला धोका सहजपणे घेता येणार नाही.

📍 “उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे. आम्ही सरकारकडून मिळत असलेल्या सुरक्षेचे पैसे देत आहोत”, असे सांगितले. त्यावर न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला.

Advertisement