SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यपालांच्या हस्ते उद्योजक अनिल मुरारका यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवी व लेखक डॉ. अनिल काशी मुरारका यांच्या ‘अनकॉमन ड्रीम्स ऑफ अ कॉमन मॅन’ या चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे संपन्न झाले.

प्रकाशन सोहळ्याला अभिनेते बोमन इराणी, दलिप ताहील तसेच प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अनिल मुरारका यांनी अँपल मिशनच्या या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दलिप ताहील यांनी यावेळी दिली.

Advertisement